ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती

Detailed information about online admission process

STAY HOME, STAY SAFE !

प्रवेश अर्ज करण्याची पद्धत : : The Admission Process:

प्रवेश प्रक्रिया एक दीर्घ प्रक्रिया आहे. Be patient !

STEP 1: नोंदणी

STEP 2 : विषय निवड/ निश्चिती

STEP 3 : ऑनलाईन वृद्धी अडमिशन फॉर्म भरणे

STEP 4 : online फी भरणे, पेमेंट करणे.

*शेवटी फी पेमेंट SUCCESSFULLY झाले तरच आपला प्रवेश पूर्ण झाला असे समजावे.

*यातील सगळ्याच पायऱ्या प्रत्येक वर्गाला लागू असतील असे नाही. जी पायरी लागू नसेल ती वगळून आपण पुढील पायरी फॉलो करावी. उशिरा प्रवेश प्रक्रियेमध्ये उतरलेल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मार्गदर्शन देतील त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

*वरील प्रत्येक पायरी बाबत या पेजवर खाली तपशीलवार माहिती दिलेली आहे.


प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्वाची सूचना

http://collegeacs.vriddhionline.com या लिंक वर क्लिक करून आपण प्रवेश अर्ज भरावा.

फक्त अर्ज केला म्हणजे आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे समजू नये.

तर त्यापुढे खालीलप्रमाणे पडताळणी वगैरे प्रक्रिया राबविली जाते--

१) अर्जदाराने भरलेली माहिती नाव, पत्ता, अर्जदाराचा फोटो, जात, दूरध्वनी क्रमांक, आधार नंबर, निवडलेले विषय, मागील वर्षी शिकलेल्या वर्गाची/ शाळेची माहिती, उत्तीर्ण /अनुत्तीर्ण वर्ष, अपलोड केलेल्या मार्कशीटची प्रत, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र व त्याची असणारी वैधता ईत्यादी बाबींची पडताळणी केली जाते.

२) आपण दिलेली माहिती अपूर्ण/ चुकीची आढळल्यास आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवून त्रुटी कळविल्या जातील.

३) आपल्या मोबाईलवर SMS वर लक्ष ठेवावे व पूर्तता लगेच करावी.

४) आपला अर्ज बरोबर आढळल्यास तो मंजूर केला जाईल व आपण लोगिन केल्यास प्रवेश शुल्क भरण्यासाठीचे लिंक असलेले बटन दिसेल. त्यावर क्लिक करून पेमेंट लगेच करावे. भीम, यु पी आय, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड इत्यादी वापरून पेमेंट करावे. तुमच्या मोबाईलवर पेमेंट अप्प नसेल तर इतर कोणाच्याही मोबाईलवरून करू शकता.

५) प्रवेश शुल्काचे पेमेंट केले तरच आपला प्रवेश कन्फर्म व पूर्ण होईल. पेमेंट केले नाही तर आपला आपल्या जागेवर हक्क राहणार नाही. दरम्यान सर्व जागा भरून प्रवेश शिल्लक राहिला नाही तर महाविद्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी.

------- प्रवेश समिती व प्राचार्य

हेल्प : मदतीसाठी : आपल्या whatsapp ग्रुपवरच प्रश्न व अडचणी मांडाव्यात. तेथेच उत्तर देऊन समाधान केले जाईल, अडचणी सोडवल्या जातील. कृपया फोन करू नये.

Online Admission form Filling (Vriddhi) ऑनलाईन वृद्धी अडमिशन फॉर्म भरणे

नोंदणी, मेरीट लिस्ट प्रक्रिया (असल्यास), विषय निवड/निश्चिती इतके टप्पे झाल्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऑनलाइन अडमिशन फॉर्म भरणे. त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.

लिंक : LInk for online admission Vruddhi Software: http://collegeacs.vriddhionline.com

1.0 कागदपत्रे:

फॉर्म भरतांना आपल्याजवळ खालील कागद पत्रे जवळ असावीत. त्यांची इमेज किंवा स्कॅन कॉपी (soft copy) ही अर्ज भरतांना अपलोड करावी लागते.

 • आधार कार्ड, दोन्ही बाजू एकाच कागदावर

 • मार्क लिस्ट,

 • शाळा सोडल्याचा दाखला,

 • जात प्रमाणपत्र,

 • फोटो (पासपोर्ट साईज). फोटो हा पासपोर्ट साठी लागणाऱ्या फोटोच्या निकषाप्रमाणे असावा. फोटो कसा असावा त्याची माहिती पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://www.collegeacs.org/photo-instructions

1.1 काही कागदपत्रे नसतील तर?

 • काही अडचणीमुळे काही कागदपत्रे नसतील, आणि ती आपण नंतर देऊ शकणार असाल, तर खालील प्रमाणे अर्ज अपलोड करण्याचा पर्याय देत आहोत.

 • अशा प्रकरणांमध्ये जर काही कारणाने प्रवेश रद्द केला तर फी चा परतावा मिळणार नाही. जर कागदपत्रे नंतर एक महिन्याच्या मुदतीमध्ये देऊ शकला नाहीत तर आपला प्रवेश रद्द ठरवण्यात येईल आणि फी चा परतावा मिळणार नाही.

1.2 शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर ? LC किंवा TC नसेल तर?:

 • बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांकडे दाखला नसेल तर त्यांनी दाखल्याच्या जागी तसा एक अर्ज स्कॅन इमेज करून अपलोड करावा. अर्जामध्ये माननीय प्राचार्य यांना उद्देशून दाखला का नाही त्याचे कारण देऊन, आपण दाखला नंतर देणार आहात अशी हमी घ्यावी. स्वतःची स्वाक्षरी करावी. या अर्जाची स्पष्ट फोटो इमेज दाखल्याच्या ठिकाणी अपलोड करावी. सुमारे एक महिन्याच्या मुदतीमध्ये मूळ दाखला आणि झेरॉक्स प्रत कार्यालयात आणून द्यावी.

 • महाविद्यालय बदलून या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे TC नसेल आणि तो त्यांना नंतर मिळणार असेल तर त्यांनी सुद्धा वरील प्रमाणे एक अर्ज लिहून त्याची इमेज अपलोड करावी. त्यानंतर एक महिन्याच्या मुदतीमध्ये पूर्तता करावी.अन्य विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालयातून या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट उशिराने मिळणार असेल तर त्यांनासुद्धा ही तरतूद लागू आहे.

 • प्रवेश रद्द केल्यास किंवा मुदतीमध्ये कागदपत्रे दिली नाहीत तर फी चा परतावा मिळणार नाही

1.3 मार्कलिस्ट ची मुळप्रत नसेल तर ? :

ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालाचा स्क्रीन शॉट, किंवा प्रिंटची इमेज आपण अपलोड करावी. नंतर मागणी केल्यावर आपण मार्कलिस्ट परत कार्यालयात आणून द्यावी.

1.4 गॅप सर्टिफिकेट नसेल तर?

गॅप सर्टिफिकेट नसेल आणि ते आपण नंतर देऊ शकणार असाल तर त्यासाठीसुद्धा वरील प्रमाणे अर्ज देऊन तो अपलोड करण्याची तरतूद आहे.

1.5 कागदपत्रे अपलोड होत नाहीत/ झाली नाहीत? कागदपत्रे अपलोड करण्याबाबत महत्त्वाची सूचना :

कागदपत्रांच्या इमेजचा साईज हा 500kb पेक्षा कमी पाहिजे. साईज जास्त असेल तर डॉक्युमेंट अपलोड होत नाही. कमी साईज ची इमेज मिळण्याकरता खालील ट्रिक वापरावी :

डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये खालील लिंक ला क्लिक करून ओपन कॅमेरा हे ॲप इन्स्टॉल करा व इन्स्टॉल झालेले ॲप ओपन करून सेटिंग मधून इमेज क्वालिटी 15% इतकी करा व त्याच ॲपने डॉक्युमेंटचा फोटो काढा. म्हणजे डॉक्यूमेंट ची साईज 500 केबी पर्यंत होते का चेक करा. व तो फोटो ऑनलाइन आपल्या फॉर्म मध्ये अपलोड करावा. जर 500 केबी पेक्षा साईज कमी होत नसेल तर अजून इमेज क्वालिटी कमी करा. Open Camera: https://play.google.com/store/apps/details?id=net.sourceforge.opencamera

2.0 मार्गदर्शनपर व्हिडिओ :

 • प्रवेशअर्ज भरण्यासंदर्भात पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहावा. त्यातून स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन मिळेल. व्हिडिओ क्र.1 Click here * व्हिडिओ क्र.2 Click here

 • ऑनलाइन फॉर्म भरताना काही अडचण आल्यास, पेज पुढे जात नसल्यास, नेट इशू असल्यास आपण पण फॉर्म रिफ्रेश किंवा रिलोड करावा. किंवा लॉग आऊट होऊन पुन्हा लॉगिन करून फॉर्म उघडावा.

3.0 अनुदानित का विनाअनुदानित?

 • प्रवेश अर्जामध्ये आपण आपला योग्य तो वर्ग निवडा. आपला प्रवेश अनुदानित वर्गांसाठी आहे का विनाअनुदानित वर्गांसाठी आहे ते नीट समजून योग्य ते पर्याय निवडा.

 • बी ए, बीकॉम, आणि बी एस सी या वर्गाच्या पहिल्या तुकडीतील प्रवेश फक्त "अनुदानित" "Granted" आहेत. नंतरच्या तुकडीतील प्रवेश हे "विनाअनुदानित" "Non-Grant" आहेत. हे सर्व वर्ग युजी UG म्हणजे अंडर ग्रज्युएट विभागात आहेत.

 • बीबीए, बीसीए, एम ए, एम कॉम, एम एस सी, या सर्व वर्गांना आपल्या महाविद्यालयात "पीजी PG" "पोस्ट ग्रज्युएट" समजले जाते. या सर्व वर्गांतील प्रवेश हे "विनाअनुदानित" "Non-Grant" असतात.

4.0 कास्ट कॅटेगरी Caste Category आणि फी कॅटेगरी Fee Category : खुलासा:

 • कास्ट कॅटेगरी Caste Category म्हणजे जातीचा संवर्ग. त्यामध्ये SC, ST, VJ, NT,OBC, SBC, SEBC,EWS, Open या जातीच्या कॅटेगरी आहेत.

 • फी कॅटेगरी Fee Category म्हणजे फी चा संवर्ग. ते फक्त दोनच आहेत- (1) आर्थिक दृष्ट्या मागास EBC आणि (2) पेईंग Note: आपला प्रवेश जर अनुदानित जागेवर असेल तरच या दोन कॅटेगरी आपल्याला लागू होऊ शकतात. (जर आपला प्रवेश विनाअनुदानित जागेवर असेल तर आपण केवळ पेइंग Paying या एकाच Category चे असाल. कारण विनाअनुदानित जागेला फी सवलती लागू नाहीत. पण नंतर आपण शासनाच्या महाडीबीटी योजनेमधून अर्ज करून शिष्यवृत्ती मिळवू शकता )

 1. EBC हा पर्याय कास्ट कॅटेगरी मधील SC/ST/NT/VJ/OBC/SBC/SEBC/EWS प्रकारच्या विद्यार्थ्यांनी निवडावा. तसेच ओपन कास्ट कॅटेगरीतील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांनी सुद्धा हा पर्याय निवडावा.

 2. पेईंग :जे विद्यार्थी शासनाच्या उत्पन्न विषयक अटींची पूर्तता, क्रिमिलेयर अटींची पूर्तता करू शकत नाहीत त्यांनी पेईंग हा पर्याय निवडावा. त्यांना ट्युशन फी मधील सवलत मिळणार नाही.

 • कास्ट कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आहेत (महाडीबीटी). त्याची स्वतंत्र माहिती वेळोवेळी दिली जाईल. या योजनेमध्ये अनुदानित आणि विनाअनुदानित असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

 • ईबीसी अंतर्गत ट्युशन फी ची सवलत घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नोटीस दिल्यानंतर उत्पन्नाचा दाखला वगैरे कागदपत्रे जोडून ईबीसी साठी अर्ज करावयाचा असतो. विद्यार्थी अशा नोटीस कडे दुर्लक्ष करतात आणि वेळेवर पूर्तता करत नाहीत. जर असा अर्ज केला नाही तरी ईबीसी ची सवलत रद्द होते आणि अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फी ची रक्कम सुमारे 980 भरावी लागते याची नोंद घ्यावी. (प्रवेश देते वेळी असे विद्यार्थी नंतर पूर्तता करतील असे समजून सवलतीचा लाभ दिला जातो.)

5.0 विषय फॉर्ममध्ये भरण्याबाबत:

आपल्याला आधीच आपले विषय निवड करून निश्चित करून दिले आहेत. पण विषयांची ती नावे आणि फॉर्म वरील नावे यामध्ये फरक आहेत. शिवाय दोन्ही सेमिस्टर चे विषय आत्ताच निवडावे लागतात. याबाबत व्हाट्सअप ग्रुप वर विषयांचा नावांचा तपशील पाठवला जाईल त्याप्रमाणे वृद्धी फॉर्ममध्ये आपण आपल्या विषयांवर टिक Tick करावी.

6.0 ऑनलाइन ऍडमिशन फॉर्म भरून सबमिट केला, आता पुढे काय?

 • आपण सबमिट केलेला फॉर्म हा कॉलेजच्या ऑफिसमध्ये पडताळून पाहिला जाईल. त्यामध्ये आपण आपला सर्व तपशील बरोबर भरला आहे का,योग्य कागदपत्रे अपलोड केली आहेत का, मेरीट यादीप्रमाणे आपला प्रवेश आहे का, आपण निवडलेले विषय बरोबर आहेत का इत्यादी बाबी तपासून पाहिल्या जातील. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आपल्याला आपण दिलेल्या मोबाइल क्रमांकावर एस एम एस मेसेज पाठविला जातो आणि त्रुटी कळवली जाते.

 • SMS मेसेज पाठवले जातात. एस एम एस मेसेजेस मध्ये पहात जावे. व्हाट्सअप मेसेज पाठविले जात नाहीत. मॅसेज हा ईमेलवर सुद्धा पाठविला जातो. तेव्हा ई-मेल पण चेक करावा. खालील प्रकारचे मेसेज येतात त्यावर लक्ष ठेवा:

 1. Subjects approved or rejected

 2. Documents approved or rejected

 3. Form approved or rejected

 4. Pay fees online Rs.

 • जर rejected मेसेज असेल तर आपण पुन्हा लॉग इन होऊन आपल्या फॉर्ममध्ये योग्य ते बदल करावेत आणि पुन्हा फॉर्म सबमिट करावा. त्यावर काही तासांनी पुन्हा आपल्याला approved किंवा rejected मेसेज येतील. आपल्या अर्जातील सर्व त्रुटी नाहीशा होईपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील. तेव्हा आपण मेसेज वर आणि ई-मेल वर लक्ष ठेवा.

 • आपला अर्ज रांगेतून तपासून आपल्याला मेसेज येण्यासाठी काही तास लागतात. तोपर्यंत आपण वाट पाहावी.

 • मेसेज पाहून आपण पुन्हा लॉग इन होऊन आपला अर्ज अपडेट करायचा असतो. त्रुटींचे निराकरण करायचे असते.

 • त्यानंतर कॉलेज ऑफिस कडून पुन्हा तपासणी होऊन आपल्याला पुन्हा मेसेज पाठवले जातात.

 • आपला अर्ज बरोबर भरुन झाल्यानंतर कॉलेज कडून तो संमत (अप्रूव्ह) केला जातो. अप्रूव्ह झाल्यावर आपल्याला एसएमएस मेसेज तसेच ई-मेल पाठवला जातो.

 • अप्रूव्ह मेसेज आल्यानंतर आपण आपल्या अकाउंट मध्ये लॉग इन होऊन आपला अर्ज उघडून तेथील शेवटी दिलेल्या पेमेंट लिंक वर क्लिक करून पेमेंट प्रक्रिया सुरु करावी.(ऑनलाइन).

 • आपला अर्ज अप्रूव्ह झाल्याशिवाय पेमेंट लिंक कार्य करत नाही. म्हणून अर्ज अप्रूव्ह होण्याच्या आधी जर आपण पेमेंटचा प्रयत्न केला तर तो निष्फळ ठरतो. पेमेंट बाबत अधिक तपशील वार माहिती खाली पुढे दिलेली आहे.

How to pay fees ? फी कशी भरावी ?

 • पेमेंट करून फी भरणे ही सगळ्यात शेवटची पायरी आहे. फी भरण्यासाठी दोन ते चार दिवस मुदत दिलेली असते. त्यामुळे घाई करू नये.

 • आपला वृद्धी ऑनलाइन अर्ज हा कॉलेज कडून अप्रूव्ह (संमत) झाला की आपल्या अर्जावरील पेमेंट लिंक कार्यान्वित (active) होते. त्याबाबतचा SMS मेसेज तुम्हाला मिळेल. मेसेज मिळाल्यावर तुमच्या वृद्धी अकाऊन्ट मध्ये लॉगीन करून तुम्ही फॉर्म पहिला तर तुम्हाला पेमेंट लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.

 • अर्ज हा कॉलेज कडून अप्रूव्ह (संमत) झाला तरच पेमेंट लिंक कार्यान्वित (active) होते. त्यापूर्वी नाही. त्या आधी लिंक वर क्लिक करून पेमेंट करायचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरतो.

 • पेमेंट लिंक वर क्लिक केल्यानंतर एक पेमेंट गेटवे ओपन होतो. त्यामध्ये भीम,UPI,जी पे, फोन पे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इत्यादी अनेक प्रकारे पेमेंट करण्याची सुविधा आहे. त्यापैकी कोणत्याही एका सोयीच्या पद्धतीने आपण पेमेंट करावे.

 • पेमेंट करताना आपण लवकर दहा मिनिटांच्या आत तेथील तपशील भरावा. खूप वेळ घेतल्यास "टाईम आऊट" होऊन पेमेंट फेल होते, हे लक्षात घ्यावे. जलदपणे भरल्यास पेमेंट सक्सेस होते.

 • पेमेंट करताना शक्यतो भिम UPI, जी पे, फोन पे, नेट बँकिंग यांचा वापर केल्यास चार्ज पडणार नाही. कार्ड वापरून पेमेंट केल्यास सुमारे एक टक्का चार्ज पडतो याची नोंद घ्यावी.

 • आपल्या मोबाईल वरुन पेमेंट करण्याची सोय नसेल तर आपण दुसऱ्याच्या मोबाईल वरून पेमेंट करू शकता. आपल्याकडे डेबिट-क्रेडिट कार्ड नसेल तर दुसऱ्याचे कार्ड वापरू शकता.

*पेमेंट सक्सेस झाल्यावर-*

आपण पेमेंट केल्यावर ते सक्सेस झाले तर आपल्याला "पेमेंट सक्सेस" चा मेसेज दिसतो. तसा एसएमएस मेसेज आपल्याला आपल्या बँकेकडून पण येतो. नंतर महाविद्यालयात आल्यावर आपल्याला कॉलेज कडून पावती (रिसीट) मिळेल. पेमेंटची रिसीट आपल्याला ईमेलवर पाठवून दिली जाईल. त्याची प्रिंट आपण केव्हाही काढून घेऊ शकता. पेमेंटची शेवटची पायरी सक्सेस झाल्याशिवाय आपला प्रवेश पूर्ण झाला असे समजू नये. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आपल्याला एसएमएस मेसेज आणि ई-मेलवरून मेसेज मिळेल. ते आपण जपून ठेवावेत.

*फी पेमेंटची पावती बाबत*

पेमेंट केल्यानंतर आपल्याला वृद्धिच्या अकाऊंटमध्ये लगेच ते दिसणार नाही. बँक सेटलमेंट झाल्यानंतर एक-दोन दिवसांमध्ये आपल्याला वृद्धि अकाऊंटमध्ये त्याचा परिणाम दिसेल. तरी आपण पण पेमेंट झाल्यानंतर लगेच वृद्धीमध्ये अकाउंट पाहून पेमेंट झाले नाही असे समजून चिंता करू नये. आणि आणि पुन्हा दुसऱ्यांदा पेमेंट करण्याचा प्रयत्न करू नये. एक-दोन दिवसांच्या कालावधीनंतर आपण वृद्धी अकाउंट मध्ये लॉगिन करून आपली पावती डाऊनलोड करू शकता. तेथून पावती मिळाली नाहीतर नंतर केव्हाही महाविद्यालयातून पावती दिली जाईल.

* पेमेंट फेल झाले तर?-*

आपल्याला पेमेंट फेलचा मेसेज येईल. दरम्यान रक्कम आपल्या खात्यावरून कमी झाली असेल तर ती काही वेळा मध्ये आपल्या खात्यावर पुन्हा जमा होईल. (Auto reversal, governed by RBI rules) रक्कम परत जमा झाली नाही तर आपण महाविद्यालयात फोनवरून कळवावे म्हणजे त्याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.

* पुढे काय?-*

आपल्या वर्गाचे अध्यापन सुरू होण्यासंदर्भात आपल्याला कळविले जाईल. त्यानुसार आपण महाविद्यालयात उपस्थित रहावे. विद्यापीठ आणि शासन जे निर्देश देईल त्यानुसार अध्यापनास त्वरित सुरुवात केली जाईल.

प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्वाची सूचना

http://collegeacs.vriddhionline.com

वरील लिंक वर क्लिक करून आपण प्रवेश अर्ज भरावा.

फक्त अर्ज केला म्हणजे आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे समजू नये.

तर त्यापुढे खालीलप्रमाणे पडताळणी वगैरे प्रक्रिया राबविली जाते--

१) अर्जदाराने भरलेली माहिती नाव, पत्ता, अर्जदाराचा फोटो, जात, दूरध्वनी क्रमांक, आधार नंबर, निवडलेले विषय, मागील वर्षी शिकलेल्या वर्गाची/ शाळेची माहिती, उत्तीर्ण /अनुत्तीर्ण वर्ष, अपलोड केलेल्या मार्कशीटची प्रत, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र व त्याची असणारी वैधता ईत्यादी बाबींची पडताळणी केली जाते.

२) आपण दिलेली माहिती अपूर्ण/ चुकीची आढळल्यास आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवून त्रुटी कळविल्या जातील.

३) आपल्या मोबाईलवर SMS वर लक्ष ठेवावे व पूर्तता लगेच करावी.

४) आपला अर्ज बरोबर आढळल्यास तो मंजूर केला जाईल व आपण लोगिन केल्यास प्रवेश शुल्क भरण्यासाठीचे लिंक असलेले बटन दिसेल. त्यावर क्लिक करून पेमेंट लगेच करावे. भीम, यु पी आय, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड इत्यादी वापरून पेमेंट करावे. तुमच्या मोबाईलवर पेमेंट अप्प नसेल तर इतर कोणाच्याही मोबाईलवरून करू शकता.

५) प्रवेश शुल्काचे पेमेंट केले तरच आपला प्रवेश कन्फर्म व पूर्ण होईल. पेमेंट केले नाही तर आपला आपल्या जागेवर हक्क राहणार नाही. दरम्यान सर्व जागा भरून प्रवेश शिल्लक राहिला नाही तर महाविद्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी.

------- प्रवेश समिती व प्राचार्य

हेल्प : मदतीसाठी : आपल्या whatsapp ग्रुपवरच प्रश्न व अडचणी मांडाव्यात. तेथेच उत्तर देऊन समाधान केले जाईल, अडचणी सोडवल्या जातील. कृपया फोन करू नये.