Hostels for Boys & Girls

ग्रामोन्नती मंडळाचे वसतिगृह

(मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे)

शांत, सुरक्षित, स्वच्छ, निसर्गरम्य वातावरणात बांधलेली ग्रामोन्नती मंडळाची वसतिगृहे मुला-मुलींसाठी उपलब्ध आहेत. वसतिगृहात २४ तास निवासी रेक्टरची देखरेख असते. आवश्यक ते फर्निचर, दिवा, फॅन, अंघोळीसाठी सोलरचे गरम पाणी वगैरे सोयी आहेत. मनोरंजनासाठी टी. व्ही. वृत्तपत्रे साप्ताहिके/मासिके वाचण्यास उपलब्ध असतात. खेळासाठी/व्यायामासाठी साहित्य व मैदान उपलब्ध आहे. भोजनासाठी मेसची व्यवस्था आहे. मासिक दरात रोज चहा नाष्टा व दोन वेळा जेवण देण्यात येते. मेसमध्ये फक्त शाकाहारी भोजन मिळते. महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यानंतर वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो. अधिक माहिती व अर्ज ग्रामोन्नती मंडळाचे कार्यालयात मिळेल.

एकूण क्षमता : ९६ मुली, ४० मुले

वसतिगृहाची फी खालीलप्रमाणे आहे :

(१० महिने कालावधीच्या शैक्षणिक वर्षासाठी) :

मुलांसाठी व मुलींसाठी :

डिपॉझिट रु. १०००

खोली भाडे रु. १२०००

मेस चार्जेस रु. २६०००

(चहा, नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण)

एकूण रु. ३९०००

वरीलप्रमाणे एकूण खर्च शैक्षणिक वर्षासाठी पॅकेजचा आहे. त्यात खाडे, रजा इत्यादी साठी परतावा दिला जाणार नाही.

अधिक तपशीलासाठी ग्रामोन्नती मंडळाचे कार्यालयात अथवा वसतिगृहाचे कार्यालयात भेटावे.

एकदा भेट देऊन वसतिगृहाची सुविधा अवश्य पहा.

मेस चा जेवताना फोटो, tv रूम फोटो