Photo Instructions

फोटो संदर्भात सूचना

ओळखपत्र, परीक्षा व प्रवेश पत्र इत्यादीसाठी तुमचा फोटो आवश्यक असतो. तुमचा फोटो हा पासपोर्टसाठी लागणाऱ्या फोटोच्या निकषानुसार प्रमाणे असावा.

खालील सूचनांकडे लक्ष द्यावे -

  1. फोटो अगदी अलीकडे काढलेला असावा. सहा महिन्यापेक्षा जास्त पूर्वी काढलेला नसावा.

  2. फोटो रंगीत व स्पष्ट असावा.

  3. फोटोचा आकार २”X २”

  4. फोटो समोरून काढलेला असावा. दोन्ही कान फोटोत दिसले पाहिजे. डोळे न झाकता कॅमेऱ्याकडे पाहून फोटो काढावा.

  5. फोटोमध्ये चेहऱ्याचा भाग जास्त पाहिजे. सुमारे ८० टक्के. फोटोत हनुवटी पासून डोक्यावरील केसापर्यंतचे अंतर १” ते १.३/८” पाहिजे.

  6. बॅकग्राउंड ही पांढरी किंवा ऑफ-व्हाईट पाहिजे.

  7. डोक्यावर टोपी किंवा हॅट नसावी. चष्मा चालेल पण चष्म्याची काच क्लीअर असावी. (टिन्टेड ग्लास नको.), गॉगल घालू नये.

  8. चेहऱ्यावर सर्वसामान्य भाव असावेत. ओठ मिटून किंचित स्मित हास्य चालेल.

  9. फोटो एखाद्या मॉडेलप्रमाणे स्टायलिश नसावा. साधा असावा.

  10. केशभूषा फॉर्मल असावी. मुलांनी साधा हेअर कट करून भांग पाडवा. मुलींनी केस बांधून फोटो काढावेत. सिनेमातील नट-नट्या प्रमाणे मोकळे सोडलेल्या केसांची हेअरस्टाईल नसावी.

  11. वेशभूषा फॉर्मल असावी. कोट-टाय-ब्लेझर अवश्य घालावा.

* वर दिलेल्या सर्व सामान्य सूचनांचा तारतम्याने अवलंब करावा *