Examinations Dept.

Exam Committee

 • Prof. Shrikant Shewale Principal

 • Prof. G.B. Hole Vice Principal

 • Prof. Sharad Kaphale Co-ordinator, Arts faculty


Note : The above members will also comprise Exam Vigilance Squad. • Dr. Rahul Gonge Chief Examination Officer CEO

 • Dr. S.D. Takalkar HOD of Commerce

 • Dr. J.P. Bhosale Head, DCRC

Satish Fulsundar

B.Com.Exam Clerk

परीक्षा विषयक महत्त्वाच्या सूचना

विद्यापीठ परीक्षा विभाग : ऑनलाईन कामकाजासंबंधी सूचना

 1. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी प्रदर्शित करण्यात येणार्‍या सूचनांची कार्यवाही गांभीर्याने घेऊन त्याची वेळेत पूर्तता करावी.

 2. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील परीक्षा विभागाच्या नोटीस बोर्डवर लावल्या जाणार्‍या सूचना व आपला चालू मोबाईल नंबर महाविद्यालयाकडे दिलेला असेल तर त्यावर एस.एम.एस. पाठविला जातो त्यावर लक्ष ठेवावे.

 3. प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पात्रता नंबर दिले जातात. हे पात्रता नंबर विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी नोंद करून ठेवावेत. कारण या पात्रता नंबरचा उपयोग ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी होतो.

 4. विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जातात. प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुरूवातीला परीक्षा फॉर्म भरताना आपल्या नावाचे प्रोफाईल तयार करावे लागते. या प्रोफाईलमध्ये आपला कायमस्वरूपी मोबाईल नंबर, ई मेल आयडी आवश्यक असतो. कारण या मोबाईल नंबर किंवा ई मेलवर आपणास वेळोवेळी परीक्षेसंबंधी विद्यापीठाकडून मेसेज पाठविले जातात. प्रोफाईल तयार करण्यासाठी प्रथम युझर नेम व पासवर्ड घ्यावा लागतो. एकदा प्रोफाईल तयार केल्यानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत याच प्रोफाईलमधून लॉग इन होऊन परीक्षा फॉर्म भरावे लागतात. त्यासाठी एकदा तयार केलेला युझर नेम व पासवर्ड कायमस्वरूपी आपल्याकडे लेखी स्वरूपात जतन करून ठेवावा.

 5. परीक्षा सुरू होण्याआधी परीक्षेचे शेड्यूल विद्यापीठाच्या http://exam.unipune.ac.in/Pages/SchedulesTimetables.html या लिंकवर जाऊन पाहता येते. त्यानुसार परीक्षा फॉर्म भरण्यासंबंधी तारखा परीक्षेच्या तारखा पाहता येतील.

 6. ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यापीठाच्या http://exam.unipune.ac.in/Pages/ExamFormsOnline.html या लिंकवर जाऊन भरावेत. यासाठी वेळेचे बंधन पाळावे अन्यथा लेट फी किंवा फाईन भरावा लागेल. त्यासाठी सतर्क राहून वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी.

 7. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या साधारण एक महिना आधी जाहिर केले जाते. ते http://exam.unipune.ac.in/Pages/SchedulesTimetables.html या लिंकवर जाऊन पाहता येईल.

 8. विद्यापीठ परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठाच्या http://exam.unipune.ac.in/Pages/results.html या वेबसाईटवर जाहीर केले जातात. या लिंकवर पुणे विद्यापीठाअंतर्गत शाखानिहाय घेतलेल्या परीक्षांचे निकाल टक्केवारीसह जाहीर केले जातात. यामध्ये तुम्हाला तुमचा निकाल सीट नंबर व आईचे नाव टाकून पाहता येईल.

 9. निकाल जाहिर झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत फोटोकॉपी / रिव्हॅल्यूएशनसाठी अर्ज करण्यासाठी लिंक चालू होते. http://exam.unipune.ac.in/Pages/PhotocopyReval.html या लिंकवर जाऊन आपण ऑनलाईन फोटोकॉपी / रिव्हॅल्यूएशनसाठी अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर फीची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर किंवा चलनाद्वारे विद्यापीठाच्या सूचनांनुसार बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एच.डी.एफ.सी. बँकेमध्ये स्वत: विद्यार्थ्याने जाऊन भरावी. त्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क करू नये किंवा फॉर्म महाविद्यालयामध्ये जमा करू नये. ऑनलाईन फॉर्म भरताना वेळेची कालमर्यादा पाळावी व अंतिम दिनांकाच्या आत चलन किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करावेत.

 10. विद्यार्थ्याने फोटोकॉपीसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यास त्याने फॉर्म भरताना दिलेल्या ई मेल किंवा मोबाईलवर फोटोकॉपीसंबंधी मेसेज येतो त्यावेळी फोटोकॉपी डाऊनलोड करून घ्यावी. त्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क करू नये.

 11. फोटोकॉपी मिळविल्यानंतर पुन्हा रिचेकिंग करून हवे असल्यास फोटोकॉपी फॉर्मप्रमाणेच http://exam.unipune.ac.in/Pages/PhotocopyReval.html या लिंकवर जाऊन ऑनलाईन रिचेकिंगसाठी अर्ज करावा व ऑनलाईन पेमेंट करावे.

 12. ज्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठाकडून कॉपी केस झालेली असेल अशा विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठ राखून ठेवते. कॉपी केलेल्या विद्यार्थ्यांना ठराविक तारखेस विद्यापीठ कक्षामध्ये बोलाऊन सुनावणी घेतली जाते. त्यानंतर कॉपी केसचा दंड रू.१००० चलनाद्वारे भरावा लागतो. त्यानुसार विद्यापीठ संबंधित विद्यार्थ्यांना http://exam.unipune.ac.in/Pages/UnfairMeans.html या लिंकवर पत्रव्यवहार करते. त्या तारखांनुसार विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये हजर व्हावे.

 13. पदवी / पदविका पूर्ण केल्यानंतर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. या संदर्भात विद्यापीठामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा साजरा केला जातो. हे पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रथम विद्यापीठाच्या वेबसाईटवर http://exam.unipune.ac.in/Pages/Certificates.html या लिंकवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा. फॉर्म भरताना गुणपत्रक जवळ ठेवावे. कारण गुणपत्रकावरील माहिती ऑनलाईन फॉर्ममध्ये भरावी लागते. या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचा मेसेज विद्यार्थ्यांना त्यांनी फॉर्म भरताना दिलेल्या ई मेल अथवा मोबाईल नंबरवर येत असतो.

 14. विद्यार्थ्यास दुबार (डुप्लीकेट) गुणपत्रक मिळवायचे असल्यास http://exam.unipune.ac.in/Pages/Certificates.html या लिंकवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. डुप्लीकेट गुणपत्रक मिळविण्यासाठी पोलीस स्टेशनची FIR दाखल केल्याची प्रत, रू.१०० च्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हीट करून स्कॅन करून ॲटेचमेंट जोडावी लागते. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर चलन बँकेत भरावे किंवा ऑनलाईन पेमेंट करावे. त्यासाठी महाविद्यालमध्ये अर्ज अथवा पैसे भरू नयेत.

 15. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साहित्य- आपल्या विद्याशाखेचा अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या http://exam.unipune.ac.in/Pages/Syllabus.html या लिंकवर जाऊन पाहता येतील. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यास आपल्या अभ्यासक्रमासंबंधी इतर शैक्षणिक माहिती, परीक्षेसंबंधी माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर वेळोवेळी दिली जाते.

महाविद्यालय परीक्षा विभाग : कामकाजासंबंधी सूचना

 1. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी प्रदर्शित करण्यात येणार्‍या सूचनांची कार्यवाही गांभीर्याने घेऊन त्याची वेळेत पूर्तता करावी. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल नंबरवर परीक्षेसंबंधी एस.एम.एस. पाठविले जातात. तसेच परीक्षा विभागाच्या नोटीस बोर्डवर वेळोवेळी नोटीसा प्रदर्शित केल्या जातात. त्यावर लक्ष ठेवावे.

 2. महाविद्यालयाची प्रथम सत्रामध्ये कला व वाणिज्य शाखांसाठी टर्म एण्ड परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतली जाते. या परीक्षेतील २० गुण विद्यार्थ्याला विद्यापीठ परीक्षेमध्ये दिले जातात. त्याचप्रमाणे विज्ञान, बीबीए/बीसीए, एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत परीक्षा घेतल्या जातात. त्या परीक्षांचे गुण विद्यापीठ परीक्षेमध्ये समाविष्ट केले जातात. त्यासाठी या अंतर्गत परीक्षा सर्व विद्यार्थ्यांनी देणे आवश्यक आहे.

 3. प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व बीबीए/बीसीए वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण विषयाची १०० गुणांची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. या परीक्षेस गैरहजर राहिल्यास गुणपत्रकावर Fail किंवा ATKT येईल. यासाठी स्पोर्टस्‌ विभागाच्या सूचनांनुसार परीक्षेसंदर्भातील कार्यवाही वेळोवेळी पूर्ण करावी.

 4. द्वितीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण हा अनिवार्य विषय आहे. या विषयाची परीक्षा फेब्रुवारी/मार्च महिन्यामध्ये घेण्यात येते. ही परीक्षा देणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. परीक्षेमध्ये गैरहजर असल्यास विद्यार्थी नापास होतो अगर विद्यापीठ निकाल राखून ठेवते. त्यासाठी वेळोवेळी संबंधित विभागप्रमुखांच्या संपर्कामध्ये राहून परीक्षा व प्रोजेक्टसंबंधी कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.

 5. कला व वाणिज्य शाखेतील जे विद्यार्थी टर्म एण्ड परीक्षेमध्ये गैरहजर किंवा नापास झालेले असतात, जे विद्यार्थी द्वितीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील पर्यावरण परीक्षेमध्ये गैरहजर किंवा नापास झालेले असतात, प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील जे विद्यार्थी अंतर्गत परीक्षांमध्ये गैरहजर किंवा नापास तसेच प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व बीबीए/बीसीए वर्गातील जे विद्यार्थी शारीरिक शिक्षण विषयाच्या परीक्षेमध्ये गैरहजर किंवा नापास झालेले असतात अशा विद्यार्थ्यांसाठी संबंधित विषयाची अंतर्गत गुणांची टर्म एण्ड बॅकलॉग परीक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये घेतली जाते. या परीक्षेमधील गुण संबंधित विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या गुणपत्रकामध्ये समाविष्ट केले जातात.

 6. विद्यापीठ परीक्षेचा ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरताना प्रोफाईलमध्ये स्वत:चे पूर्ण नाव (आडनाव प्रथम), आईचे बरोबर नाव व विषय अचूक भरावेत. खात्री करून नंतरच फॉर्म सबमीट करावा.

 7. विद्यापीठ परीक्षेचे हॉलतिकीट महाविद्यालयाकडून मिळाल्यानंतर त्यावरील आपले नाव, आईचे नाव, विषय तपासून पहावेत. काही चूक असल्यास त्वरीत महाविद्यालयाच्या परीक्षा विभागामध्ये अर्ज करावा. त्यानुसार दुरूस्तीसाठी कार्यवाही केली जाईल.

 8. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी जबाबदारीने आपल्या परीक्षांचे गुणपत्रक महाविद्यालयाकडून त्वरीत घेऊन जावे. महाविद्यालयाचा परीक्षा विभाग आपले निकाल सहा महिन्यांपर्यंत संग्रही ठेवते. त्यानंतर विद्यार्थ्यास गुणपत्रक देण्याची जबाबदारी महाविद्यालयाची राहणार नाही.

 9. महाविद्यालयातील परीक्षेचे हॉलतिकीट, गुणपत्रक घेण्यासाठी स्वत: जबाबदारीने येऊन घेऊन जावे. येताना सोबत आयकार्ड आणावे. इतर कोणत्याही नातेवाईक किंवा व्यक्तीस हॉलतिकीट, गुणपत्रक दिले जाणार नाही.

 10. प्रथम वर्ष वर्गातील डुप्लीकेट गुणपत्रक हवे असल्यास परीक्षा विभागामध्ये अर्ज द्यावा. त्यासाठी पोलीस स्टेशनची FIR दाखल केल्याची प्रत, रू.१०० च्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हीट करून रितसर फी महाविद्यालयामध्ये भरावी. त्यानंतर एक दिवसाच्या कालावधीमध्ये दुबार गुणपत्रक मिळेल.

 11. गुणपत्रक मिळाल्यानंतर काही दुरूस्ती असल्यास दहा दिवसांच्या आत त्वरीत महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा व अर्ज करावा. त्याप्रमाणे दुरूस्तीसाठी कार्यवाही केली जाईल.

 12. कॉपी केस झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरता प्रवेश दिला जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज तात्पुरत्या स्वरूपात स्विकारले जातील. विद्यापीठ परिपत्रक क्र.२१८ / १९९७ नुसार विद्यार्थी जर परीक्षा गैरप्रकरणात दोषी आढळला तर त्या विद्यापीठाने दिलेल्या शिक्षेच्या प्रकारानुसार त्याचा महाविद्यालयातील प्रवेश, तसेच विद्यापीठ परीक्षा अर्ज आपोआप रद्द समजला जाईल. यासाठी भरलेली फी परत केली जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवरच महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे अथवा परीक्षा फॉर्म भरावयाचा आहे.

 13. कॉपी केस गैरप्रकरणात सापडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना पुन्हा त्या परीक्षेसाठी सर्व विषयांचा अर्ज भरावा. परीक्षेच्या काळापर्यंत विद्यापीठाचा निर्णय त्यांना न कळविल्यास संपूर्ण विषयांची परीक्षा त्यांनी पुन्हा द्यावी. मात्र विद्यापीठातर्फे त्यांच्या प्रकरणाबाबत जो निर्णय दिला जाईल त्यानुसार त्यांच्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.

परीक्षेला येताना…

 1. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वेळापत्रकाप्रमाणे वेळेवर अर्धा तास आधी उपस्थित रहावे.

 2. परीक्षेला येताना गळ्यात आयकार्ड परीधान करावे. ओळखपत्र वापरून स्कॅनरवर उपस्थिती नोंदवा.

 3. परीक्षा कालावधीमध्ये मोबाईल वापरास बंदी आहे. मोबाईल आणू नयेत.

 4. कॉपी करू नका, कॉपी आणू नका, कॉपी सोबत बाळगणे हा गुन्हा आहे.

 5. तपासणीमध्ये कॉपी आढळल्यास कॉपी केस केली जाईल. त्यामुळे तुमचे नुकसान होईल याची पूर्वकल्पना देत आहोत.

 6. परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या मेन गेटवर व परीक्षा हॉलमध्ये अंतर्गत भरारीपथकामार्फत वारंवार तपासणी करण्यात येते.

 7. परीक्षेमध्ये कॉपी केस झाल्यास त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिपत्रक क्र.१८३/२०११ नुसार प्रत्येकी रू.१०००/- दंड करण्यात येतो तसेच निकाल राखून ठेवले जातात. म्हणून कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये.

 8. परीक्षागृहात मोबाईल खिशात ठेऊ नयेत. मोबाईल खिशात ठेऊ नयेत. बाहेर ठेवलेल्या मोबाईलची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची नाही.

 9. परीक्षार्थीने महाविद्यालयाची शिस्त पाळलीच पाहिजे. अध्यापक, सेवक यांच्या सूचनांचे पालन केलेच पाहिजे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियम पाळून सहकार्य करा. कोणीही वाद घालू नये.

 10. परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहित असताना विद्यार्थ्यांनी आपल्य उत्तरपत्रिकेवर आपला सीट नंबर व इतर माहिती अचूक भरावी, त्यानंतर सुपरवायझर रिपोर्टवर सही करणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिका व्यवस्थित सुस्थीत सुपरवायझरकडे द्यावी मगच परीक्षा हॉलमधून बाहेर पडावे.

 11. आपली तक्रार असल्यास प्रथम परीक्षा विभाग प्रमुख, उपप्राचार्य व प्राचार्य यांना क्रमाने भेटावे. भेटताना सोबत मित्र, मैत्रिणी आणू नयेत. पालकांना (आई वडील) सोबत आणावे.

 12. परिसरात कागदाचे कपटे (कॉपी फाडलेले वगैरे) टाकू नयेत. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवावा.

कॉपीमुक्त शिस्तबद्ध परीक्षा

 • परीक्षेला येताना ओळखपत्र व हॉलतिकीट आणणे अनिवार्य आहे.

 • अभ्यास करून परीक्षा द्या. वर्षभर तासांना नियमित उपस्थित राहून अभ्यास केल्यास परीक्षेत कॉपी वगैरे गैरप्रकार करण्याची गरज राहणार नाही.

 • परीक्षेमध्ये कॉपी करू नका. कॉपी आणू नका. कॉपी सोबत बाळगणे हा गुन्हा आहे.

 • परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या मेन गेटवर व परीक्षा हॉलमध्ये अंतर्गत स्कॉडमार्फत वारंवार तपासणी करण्यात येते.

 • तपासणीमध्ये कॉपी आढळल्यास कॉपी केस केली जाईल. त्यामुळे नुकसान तुमचे होईल याची पूर्वकल्पना देत आहोत. अशा विद्यार्थ्यांचे त्या परीक्षेतील गुण रद्द करणे, फी सवलती/शिष्यवृत्ती रद्द करणे आणि स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून न पाठविणे इ. कारवाई केली जाईल.

 • मोजे, बूट, इतर साहित्य काढून परीक्षागृहाबाहेर ठेवावेत.

 • मोबाईल सोबत आणूच नयेत. मोबाईल खिशात ठेवलेला आढळल्यास जप्त केला जाईल.

 • बाहेर सॅकमध्ये ठेवलेल्या आपल्या मूल्यवान वस्तूंची (पैसे, दागिने, मोबाईल इ.) चोरी होऊ शकते. त्याची जबाबदारी महाविद्यालयावर नाही.

 • परीक्षार्थीने महाविद्यालयाची शिस्त पाळलीच पाहिजे. अध्यापक, सेवक यांच्या सूचनांचे पालन केलेच पाहिजे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियम पाळून सहकार्य करा. कोणीही वाद घालू नये.

 • आपली काही अडचण वा तक्रार असल्यास प्रथम परीक्षा विभाग प्रमुख, उपप्राचार्य व प्राचार्य यांना क्रमाने भेटावे. शक्यतो पालकांना (आई-वडील) सोबत आणावे. सोबत मित्र-मैत्रिणी आणू नयेत.

 • परिसरात कागदाचे कपटे (कॉपी फाडलेले वगैरे) टाकू नयेत. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवावा.

परीक्षा संदर्भातील नियम : ए. टी. के. टी.

A.T.K.T. = Allowed to keep terms, काही विषयात नापास असला तरी पुढील वर्गात बसण्यास परवानगी असणे

प्रथम व्दितीयवर्ष बी. ए./बी. कॉम./बी. एस्सी. च्या ए. टी. के. टी. बाबत वरील विषयांच्या संदर्भात विद्यापीठ परिपत्रक क्र. ३४०/१९९२ व १२८६/२९ मे ९५ नुसार कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी खालीलप्रमाणे ए. टी. के. टी. नियम आहेत.

कला शाखा:

बी. ए. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातून व्दितीय वर्षात जाताना विद्यार्थी प्रथम वर्षाच्या जास्तीत जास्त दोन विषयात अनुत्तीर्ण असला तरी त्यास व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. व्दितीय वर्षातून तृतीय वर्षात जाताना विद्यार्थी व्दितीय वर्षाच्या परीक्षेत जास्तीत जास्त दोन विषयात अनुत्तीर्ण असला तरी त्यास तृतीय वर्षाच्या प्रवेशास पात्र समजण्यात येईल. मात्र अशा विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या सर्व विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उत्तीर्ण झाल्याशिवाय तृतीय वर्षाच्या विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षेस बसता येणार नाही.

वाणिज्य शाखा:

बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातून व्दितीय वर्षात जाताना विद्यार्थी प्रथम वर्षाच्या लेखी परीक्षेच्या जास्तीत जास्त दोन विषयात आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या एका विषयात अनुत्तीर्ण असला तरी त्यास व्दितीय वर्षाच्या प्रवेशास पात्र समजण्यात येईल. व्दितीय वर्षातून आणि तृतीय वर्षात जाताना विद्यार्थी व्दितीय वर्षाच्या लेखी परीक्षेच्या जास्तीत जास्त दोन विषयात आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या एका विषयात अनुत्तीर्ण असला तरी त्यास तृतीय वर्षाच्या प्रवेशास पात्र समजण्यात येईल. मात्र अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या सर्व विषयात उत्तीर्ण झाल्याशिवाय तृतीय वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षेस बसता येणार नाही.

विज्ञान शाखा:

बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातून व्दितीय वर्षात जाताना प्रथम वर्षाच्या जास्तीत जास्त कोणत्याही चार विषयात (लेखी- ३ व प्रात्यक्षिक- १ परीक्षा) अनुत्तीर्ण असला तरी त्यास व्दितीय वर्षासाठी प्रवेशास पात्र समजण्यात येईल. व्दितीय वर्षातून तृतीय वर्षात जाताना विद्यार्थी वर्षाच्या कोणत्याही तीन विषयात (लेखी- २ व प्रात्यक्षिक - १) अनुत्तीर्ण असल्यास प्रवेशास पात्र समजण्यात येईल. मात्र तो प्रथम वर्षातील सर्व विषयांत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बी. बी. ए. / बी. सी. ए.

प्रथम/व्दितीय वर्षामध्ये जास्तीत जास्त ३ लेखी व १ प्रात्यक्षिक विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण असला तरी पुढच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असेल. तृतीय वर्षात प्रवेश घेतेवेळी तो प्रथम वर्षातील सर्व विषयात उत्तीर्ण असे आवश्यक आहे.

Eligibility No.'s

Eligibility No.'s

प्रथम वर्ष बी. ए./बी. कॉम./बी.एस्सी./बी.एस्सी. कॉम्प्युटर/बी.बी.ए.(सी.ए.)

या वर्गासाठी अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया

निवड आधारित श्रेयांक पध्दत (C.B.C.S.)

प्रथम वर्ष बी. ए./बी. कॉम./बी.एस्सी./बी.एस्सी. कॉम्प्युटर/बी.बी.ए.(सी.ए.)

या वर्गांना शिकणाऱ्या सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की, सातत्यपूर्ण मूल्यमापन अंतर्गत आपण प्रत्येक पेपरसाठी खालील पध्दतीचा अवलंब करावा.

सदर पध्दती ३०% अंतर्गत गुणांसाठी असेल. (१५+३५+=५०) किंवा (३०+७०=१००)

 1. आपण शिकवत असलेल्या पेपरसाठी प्रत्येकी १० मार्क्सच्या दोन परीक्षा घ्याव्यात. यामध्ये रिकाम्या जागा भरा, बहुपर्यायी, चूक/बरोबर, संज्ञा स्पष्ट करा, एका वाक्यात उत्तरे लिहा या स्वरूपाचे प्रश्न असावेत.

 2. विद्यार्थ्याची प्रगती विचारात घेऊन गरज असल्यास तिसरी परीक्षा घ्यावी.

 3. वरील परीक्षापैकी मिळालेले मार्क्स व एकूण मार्क्स यांचा १० मार्क्ससाठी विचार करावा.

 4. उरलेल्या ५ मार्क्ससाठी आपण खालील मूल्यमापन पध्दतीचा अवलंब करावा.

 • विद्यार्थी उपस्थिती व शिस्त

 • गृहपाठ व वर्गपाठ

 • संदर्भग्रंथ वाचन व सारांश लेखन

 • तोंडी परीक्षा

 • गट चर्चा, सेमिनार, प्रकल्प, सर्वेक्षण, अभ्यास सहली.

 • विद्यार्थी किंवा शिक्षकांनी मुल्यमापनासाठी वापरलेली नाविन्यपूर्ण पध्दती